सर्वसामान्यांना महागाईची ओवाळणी… CNG पुन्हा महागला; गेल्या 4 महिन्यात तब्बल 10 रुपयांची वाढ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आखातात सुरू असलेल्या संघर्षाचा परिणाम देशातील इंधनांच्या दरांवरही होत आहे. कधी पेट्रोल-डिझेल, तर कधी एलपीजीच्या दरांमुळे सर्वसामान्यांचा खिसा कापला जात आहे. आता इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडने (आयजीएल) सीएनजीच्या दरामध्ये पुन्हा एकदा वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

आयजीएलने सीएनजीच्या दरामध्ये प्रति किलोमागे 3.89 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला असून हे नवीन दर शनिवार सकाळपासून लागू होणार आहेत. यामुळे राजधानी दिल्लीमध्ये सीएनजीचे दर 86.98 प्रति किलोग्रॅम झाले आहेत. या दरवाढीमुळे सीएनजी वाहनधारकांच्या खिशावर अतिरिक्त ताण येणार आहे.