मध्यरेल्वेवर विद्याविहार ते ठाणेदरम्यान आज साडेपाच तासांचा ब्लॉक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य रेल्वेच्या मेन लाईन आणि ट्रान्स हार्बर मार्गावर रविवारी पाच तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मेन लाईनवर विद्याविहार आणि ठाणे स्थानकांदरम्यान सकाळी 8 ते दुपारी 1.30 या वेळेत ब्लॉक असेल. ब्लॉक काळात लोकल ट्रेनच्या जलद मार्गावरून मेल-एक्सप्रेस धावणार आहेत.

ट्रान्स हार्बर मार्गावर रविवारी ठाणे आणि वाशी/नेरूळ स्थानकांदरम्यान सकाळी 11.10 ते सायंकाळी 4.10 वाजेपर्यंत ब्लॉक असेल. या काळात ठाणे आणि वाशी/नेरूळ/पनवेल स्थानकांदरम्यान लोकल सेवा बंद राहील. सकाळी 10.35 ते सायंकाळी 4.07 वाजेपर्यंत ठाणे येथून वाशी/नेरूळ/पनवेल येथे जाणाऱया लोकल ट्रेन तसेच सकाळी 10.25 ते सायंकाळी 4.09 वाजेपर्यंत पनवेल/नेरूळ/वाशी येथून ठाणे येथे येणाऱया लोकल फेऱ्या रद्द राहतील.