
हिंदुस्थानी सैन्याच्या कारगील क्षेत्रात एक थरारक बचाव मोहीम राबवत एका रुग्णाला सुखरूप एअरलिफ्ट केले. यासंदर्भातील व्हिडीओ आणि माहिती लष्कराने सोशल मीडियावर दिली.
लष्कराच्या हेलिकॉप्टरने 18,600 फूट उंचावर नुन कुन या भागाजवळ सोसाटय़ाचा गोठवणारा वारा आणि अवघड डोंगराळ भागात ही कठीण मोहीम राबवली. या ठिकाणी हेलिकॉप्टर उतरविण्यासाठी पुरेशी जागा नव्हती. अशा स्थितीत वैमानिकाने काwशल्य आणि साहस दाखवत हेलिकॉप्टरचा केवळ एक पाय डोंगराच्या कडय़ावर टेकवला आणि हेलिकॉप्टर संतुलित ठेवले. त्यानंतर जवानांनी अतिशय गंभीर अवस्थेत असलेल्या रुग्णाला एअरलिफ्ट केले. परिस्थिती पाहता उड्डाण घेण्यासाठी मर्यादित इंधन हेलिकॉप्टरमध्ये ठेवण्यात आले. याशिवाय हेलिकॉप्टरमधील अवजड सामान हटविण्यात आले.

























































