
गणेशोत्सव निर्विघ्न पार पाडण्यासाठी रायगड पोलिसांनी समाजकंटकांवर कडक वॉच ठेवला आहे. उत्सवाच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांची शांतता भंग करणाऱ्या तब्बल ६५६ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करत नोटिसा बजावल्या आहेत. त्यामुळे हुल्लडबाजी करून सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये समाजकंटकांना चाप बसणार आहे.
दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या माध्यमातून विविध धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना, विसर्जन मिरवणुका, ढोल-ताशे तसेच विविध ठिकाणी होणारी गर्दी यावेळी कायदा व सुव्यवस्था राखण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर असते. या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव उत्साहात, शांततेत आणि निर्विघ्नपणे पार पडावा तसेच उत्सवाच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आतापर्यंत रायगड पोलिसांनी ६५६ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नजर
अफवा पसरवणारे किंवा धार्मिक सलोखा बिघडवणारे मेसेज, पोस्ट पसरू नयेत म्हणून पोलिसांची सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर करडी नजर आहे. तसेच नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहनही पोलिसांनी केले आहे. कोणतीही संशयास्पद व्यक्ती, वस्तू किंवा हालचाल आढळल्यास तत्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी किंवा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी



























































