
>> मुलाखत – नमिता वारणकर
लॉकडाऊनने जगण्याची खडतरता दाखवली. अनेक तथाकथित पालकांनी सर्वस्वी आपल्यावर अवलंबून असणाऱया घरातील सगळय़ात छोटय़ा बाळांना बाहेरची वाट दाखवली. पण खडतर वाटेवर काही माणुसकीची फुलंही उमलली…
कोरोना काळ… सगळ्यांसाठीच अवघड काळ. अगदी शहरातील पशुपक्ष्यांनाही हा काळ तसा कठीणच गेला. कारण अनेक तथाकथित जागरुक ‘माणसांनी’ आपल्या घरातील या सगळ्यांत छोटय़ा आणि खऱया अर्थाने निष्पाप सदस्यांना थेट बाहेरचा रस्ता दाखवला. या गुंतागुंतीच्या पार्श्वभूमीवर काही माणसांनी मात्र माणुसकीचे सच्चे रंग दाखवून दिले.
समुद्रातील मृत मासे, शेवाळं, गवत खाऊन पाणी स्वच्छ ठेवणारे ‘कासव‘. मानवी चुकांमुळे त्यांना इजा होते. मच्छीमारांच्या जाळ्यात अडकतात. यामुळे त्यांचे पंख कापले जातात, त्यांचा गुदमरून मृत्यू होतो, मोठय़ा जहाजांचा धक्का लागून त्यांच्यावरील कवचाला तडा जातो. शिवाय प्लॅस्टिक पिशव्या, स्ट्रॉ यामुळेही त्यांना अपाय होतो. अशा जखमी अवस्थेत किनाऱयांवर वाहून येणाऱया समुद्री कासवांसाठी ऐन लॉकडाऊनमध्येच वन विभागाच्या कांदळवन कक्षाकडून (मॅन्ग्रोव्ह सेल) फाऊंडेशन मुंबईत पहिले कासव उपचार पेंद्र निर्माण करण्यात आले आहे. यामुळे मुंबईच्या सर्व सागरी किनाऱयांवर जखमी अवस्थेत सापडणाऱया कासवांवर उपचार करणे शक्य होईल.
पावसाळ्यात बरीच कासवं स्थलांतरित होऊन सागरी किनाऱयांवर येतात. या ऋतूत पाण्याचा प्रवाह बदलतो. जोरदार लाटांमुळे जे मोठे कासव किंवा आधीच जखमी, आजारी असलेल्या कासवांना नीट पोहता येत नाही. त्यामुळे ते किनाऱयावर येतात. अशा कासवांवर आपण उपचार करून ते पूर्ण बरे झाले की, त्यांना पुन्हा समुद्रात सोडणे, हा आपला उद्देश आहे. यासाठी डहाणू येथील प्रादेशिक वनविभाग आणि डब्ल्यूसीएडब्ल्यूए या कासव उपचार पेंद्रावर येणारा भार लक्षात घेऊन ऐरोली येथील कांदळवन प्रतिष्ठान पेंद्र लॉकडाऊन काळात तयार करण्यात आले. या काळात अलिबाग आणि मुंबईतील काही किनाऱयांवर जखमी कासवे वाहून आलेली सापडली. त्यातल्या काही कासवांचे पोहण्यासाठी वापरले जाणारे पंख तुटलेले होते, तर काही कासवे अशक्त होती. त्यांना तातडीने या उपचार पेंद्रात दाखल करून उपचारास सुरुवात केली. तसेच रायगड, सिंधुदुर्ग, पालघर, डहाणू असे प्रत्येक जिह्यात एक कासव उपचार पेंद्र भविष्यात उभारले जाणार आहे.
कार्यशाळा …
कासव संवर्धनासाठी दिनांक 5, 7 आणि 9 नोव्हेंबर रोजी रायगड आणि रत्नागिरी जिह्यात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. कासवांच्या अंडय़ांचे संरक्षण कसे करावे या विषयावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच कासवांच्या वाढणाऱया समस्या आणि त्यावर उपाययोजनेकरिता काय करायला हवे याविषयी चर्चा आणि प्रशिक्षणही स्वयंसेवकांना देण्यात येणार आहे.
कासवांसाठी औषधं….
कासवांवर उपचार करण्यासाठी काय वैद्यकीय सामग्री वापरली जाते यावर जीवशास्त्र्ाज्ञ हर्षल कर्वे उत्तर देतात की, कासवांसाठी वेगळी वैद्यकीय सामग्री आपल्याकडे नाही. उपचाराकरिता डॉक्टरांचा गट आम्ही तयार केला आहे. बेटाडीन, एस्पिरिन, जखमेवर कोरफडीचा गर लावणे अशा प्रकारे आपल्याच औषधांचं मिश्रण करून जी औषधं त्यांच्यासाठी योग्य आहेत याचा अभ्यास करून त्यांना ते औषध दिले जाते. पुत्रा, मांजर या प्राण्यांवरही असेच उपचार केले जातात. तसेच कासवांच्या फुफ्फुसांना इजा, संक्रमण झाल्यास ते पोहूही शकत नाहीत. अशा वेळी त्यांना वाफ दिली जाते.
कसे होतात उपचार?
माणसांच्या रुग्णालयाप्रमाणेच हे कासवांचं रुग्णालय असतं. त्यामध्ये त्यांच्या उपचाराकरिता अनेक सुविधा उपलब्ध असतात. तिथे समुद्राचं पाणी आणलं जातं आणि ज्या ठिकाणी समुद्राचं पाणी उपलब्ध नसेल तिथे समुद्राचं पाणी पृत्रिम पद्धतीने तयार केलं जातं. परिसरातील प्रदूषित खाडीचं पाणी कासवांसाठी वापरलं जात नाही. उपचार पेंद्रात दाखल केल्यावर त्यांच्या शरीराची चाचणी होते. जखम काय झाली आहे का? एक्सरे काढले जातात यामुळे शरीराच्या आतील जखम कळते. तसेच शरीरात काही अडकलं असेल तर तेही लक्षात येतं. कासव पाण्यातील वनस्पती, किडे खातात पण प्रदूषणामुळे त्यांच्या पोटात प्लॅस्टिक पिशव्याही सापडतात. कधी कधी जाळ्यात अडकल्यामुळे पंख तुटतात. याकरिता आधी त्यांची स्विमिंग टेस्ट घेतली जाते. त्यानंतर उपचार ठरवले जातात. पूर्ण बरे झाल्यानंतरही या कासवांना समुद्रात सोडण्याआधी त्यांना खोलवर जाऊन पोहता येतंय का? या सर्व चाचण्या केल्यानंतरच त्यांना समुद्रात सोडण्याचा विचार केला जातो.

























































