
>> अनघा सावंत
महिला मंडळ म्हणजे जिथे स्त्रियांना मनोरंजनाबरोबरच आपले ज्ञान, जीवनानुभव, सुखदुःखे व्यक्त करता येतात आणि सर्वात महत्त्वाचे – स्वतःची प्रगती साधता येते असे हक्काचे ठिकाण. म्हणूनच आज कित्येक महिला मंडळे अनेक दशके यशस्वी वाटचाल करताना दिसतात. असेच एक उल्लेखनीय मंडळ म्हणजे माहीम महिला मंडळ.
महिलांची सर्वांगीण प्रगती व्हावी या हेतूने 16 जानेवारी 1952 रोजी कमलाबाई पाटकर, नंदिनी पंडित आणि मनोरमाबाई नगरकर या भगिनींनी ‘माहीम महिला मंडळा’ची स्थापना केली. सुरुवातीला मंडळाची स्वतःची जागा नसल्यामुळे शैलजा ओगळे, रमाबाई मोहिते आणि इंदिराबाई देशपांडे यांच्या घरी दर बुधवारी कार्यक्रम होत असे. मात्र 1955 मध्ये श्री राममंदिर ट्रस्टचे काळे यांच्या सहकार्याने मंडळाला राममंदिरात दर बुधवारी कार्यक्रम करण्याची संमती मिळाली. या कार्यक्रमात निरनिराळ्या विषयांवरची भाषणे, खाद्यपदार्थांची प्रात्यक्षिके आणि खेळांच्या स्पर्धा होत. या काळात अहिल्याबाई या मंडळाच्या अध्यक्षा होत्या.
मंडळाने 1955 साली डॉ. कुमुदिनी गुप्ते यांच्या रुग्णालयात मोफत कुटुंब नियोजन केंद्र सुरू केले. त्या केंद्रावर 600 भगिनींनी लाभ घेतला. तसेच गोरगरीब मुलांसाठी आणि गरोदर स्त्रियांसाठी दूध केंरही सुरू केले. सुरुवातीला मंडळाची हक्काची जागा नव्हती. मंडळाची फीसुद्धा कमी म्हणजेच फक्त दोन रुपये होती. तेव्हा हातात पैसा नसल्यामुळे मंडळाच्या भगिनी स्वतः तीन अंकी नाटक बसवून ते नाटय़गृहात सादर करून मिळालेल्या पैशांमधून मंडळाचा खर्च चालवीत असत, ही अतिशय कौतुकाची बाब आहे.
1977 साली डॉ. हेमचंद्र गुप्ते यांच्या सहकार्याने महानगरपालिका समाज कल्याण पेंद्रात मंडळाला स्वतःची हक्काची जागा मिळाली. याविषयी मंडळाच्या उपाध्यक्षा अनुराधा बेरी म्हणाल्या, योगायोग म्हणजे 1977 हे वर्ष मंडळाचे रौप्य महोत्सवी वर्ष होते. यानंतर मंडळाने बालवाडी, भजन वर्ग, सहकारी औद्योगिक संस्था, शिवणवर्ग, वधू-वर सूचक मंडळ असे विविध उपक्रम सुरू केले. तसेच 1977 मध्येच मंडळाने झुणका-भाकर पेंद्रही सुरू केले. डॉ. कुमुदिनी गुप्ते जवळ जवळ 30 वर्षे मंडळाच्या अध्यक्षा होत्या.
मंडळाचे समाजकार्य
शासनाने सुरू केलेल्या माहिती प्रधान क्षेत्रीय बचत योजनांमध्ये मंडळ सहभागी झाले. मंडळाने हे कार्य 25 वर्षे केले. याची दखल घेऊन मंडळाला मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्रकही प्राप्त झाले.
मंडळातर्फे अनेक आंतर महिला संस्थांच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात. त्यातील एक म्हणजे पै. अहिल्याबाई काळे ही स्पर्धा होय. सुरुवातीला ही स्पर्धा वेगवेगळ्या विषयांवर आयोजित केली जात होती. अलीकडे मात्र ही स्पर्धा ‘नाटय़ वाचन स्पर्धा’ म्हणून साजरी केली जाते. हे मंडळाचे वैशिष्टय़ आहे. तसेच वीर कथाकथन स्पर्धा व गीता पाठांतर स्पर्धासुद्धा संस्थांकरिता तसेच वैयक्तिक स्वरूपातही घेतली जाते.
मंडळातर्फे वर्षा संध्या (कांदेनवमी), कोजागिरी पौर्णिमा, विविध खेळांच्या स्पर्धा, वार्षिक स्नेहसंमेलन, तिळगुळ समारंभ, आनंद बाझार, जागतिक महिला दिन, वसंतोत्सव हे विशेष कार्यक्रम उत्साहाने साजरे केले जातात. मंडळातर्फे दिव्यांगांच्या अंगीभूत कलेचे काwतुक करण्याकरिता अपंग दिनही साजरा केला जातो.
मंडळ वेगवेगळ्या संस्थांना भेटी देते. सर्व भगिनींनी एकत्र यावे यासाठी दरवर्षी सहल आयोजित करण्यात येते. उत्तर विभाग संयुक्त संस्थेमध्ये मंडळाच्या दोन प्रतिनिधी मीटिंगसाठी जातात.
सध्या मंडळाचा कार्यभार अध्यक्षा रंजना राजे, उपाध्यक्षा अनुराधा बेरी, खजिनदार रेखा राऊत, कार्यवाह मीना देसाई, शुभांगी ठाकूर, सल्लागार शिल्पा वासुदेव, मीना राजे तर सभासद सविता भट, रश्मी मंत्री, अरुणा दांडेकर, स्मिता पालव, लता शिरोडकर सांभाळत आहेत.































































