लेख – उत्तर कोरियाचे गूढ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> सनत्कुमार कोल्हटकर

उत्तर कोरिया हा एक गूढ देश आहे. त्या देशाची माहिती कोठेही उपलब्ध होत नाही. उत्तर कोरियातून दक्षिण कोरियामध्ये आश्रय घेतलेल्या आणि नंतर अमेरिकेत आलेल्या मूळ उत्तर कोरियन असणाऱया योंमी पार्क यांनी लिहिलेल्या ‘इन ऑर्डर टू लीव्ह’ या पुस्तकामधून ही माहिती समोर येते. याच्या अगदी उलट परिस्थिती आहे दक्षिण कोरियातील. दोन्ही कोरियामधील भाषा एकच, पण परिस्थिती दोन टोकांची. उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया या दोन्ही देशांबद्दल आपण ऐकून असतो.

या भूतलावर असेही देश आहेत की, तेथील सामान्य नागरिक एका वेगळ्या उपग्रहावरील जगात असल्यासारखे राहतात. बाहेरचे जग कसे असते, तेथील भाषा, राहणीमान कसे असते, लोकांमधील आपसातले संबंध कसे असतात याबद्दल या लोकांना कल्पनाच नाही. ही वस्तुस्थिती आहे उत्तर कोरियाची. येथे राहणाऱया नागरिकांना उत्तर कोरिया म्हणजे स्वर्ग असल्याचे त्यांच्या शिकत्या वयापासून शिकविले जाते. त्यांचा देव म्हणजे ‘किंग जोन’ या कुटुंबातील जी व्यक्ती सत्ताधीश असेल ती. तेथील सामान्य लोकांना ‘इंटरनेट’ वगैरे समाज माध्यमांपासून पुरेपूर दूर ठेवलेले आहे. प्रत्येक दोन व्यक्तींमध्ये ‘अविश्वास’ आहे. तेथील सार्वजनिक स्थळांवर फिरणारे लोक पाहिले तर कोणीही दोन लोक एकत्र फिरताना दिसत नाहीत. ही किमया आहे साम्यवाद आणि त्यातून उद्भवणाऱया हुकूमशहांच्या दहशतीची. अशीच परिस्थिती काही वर्षांपूर्वी रशिया, इटली येथे स्टालिन आणि मुसोलिनीच्या काळात होती असे सांगतात. उत्तर कोरियामध्ये 30 टक्क्यांपेक्षा जास्त लोकांना दोन वेळचे पोटभर अन्नही मिळत नाही असे सांगतात.

अनोळखी लोकांशी परिचय करावयाचा नाही. ओळख वाढवायची नाही. बोलताना अत्यंत सावधानता बाळगायची आणि स्वतःच्या जिवाची काळजी घ्यावयाची. सामान्य लोकांनी स्वतंत्रपणे विचारच करावयाचा नाही अशी परिस्थिती आणणे ही हुकूमशहांची राज्य चालविण्याची पद्धत. ‘किंग जोन यून’ यांचे वडील लोकांसाठी काम करता करता अतिश्रमाने मरण पावले अशी ‘किंग जोन यून’ नियंत्रित व्यवस्थेने तेथील सामान्य जनतेला सांगितलेली कथा, तर बाहेरील देशांमध्ये हा नेता हृदयविकाराने गेला असे सांगितले गेले. लोकांचा एकमेकांवर विश्वासच तयार होता कामा नये. कोणी राज्यकर्त्यांविरोधात बोलला तर त्याची नोंद सामान्य लोकांमधील गुप्तहेर घेतात आणि वरपर्यंत ती गोष्ट पोहोचते. मग त्या व्यक्तीविरोधात फक्त कारवाईच होत नाही तर त्याला गायबच केले जाते. तात्पर्य लोक व्यवस्थेविरुद्ध बोलावयास धजावतच नाहीत. हीच परिस्थिती सध्या चीनमध्ये दिसू शकते.

याच्या अगदी उलट परिस्थिती आहे दक्षिण कोरियातील. दोन्ही कोरियामधील भाषा एकच, पण परिस्थिती एकदम दोन टोकांची. उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया या दोन्ही देशांबद्दल आपण ऐकून असतो. दक्षिण कोरियाची आपल्याला जास्त माहिती असते. कारण हिंदुस्थान आणि दक्षिण कोरिया या दोन्ही देशांमध्ये मोठा व्यापार चालतो आणि दोन्ही देशांचे लोक एकमेकांच्या देशात ये-जा करू शकतात. दक्षिण कोरियाने तर तंत्रज्ञानात जगात जपाननंतर मोठी आघाडी घेतलेली आपणाला दिसते, पण याच दक्षिण कोरिया लागून असणाऱया उत्तर कोरियाबद्दल कोणालाही माहिती नसते. उत्तर कोरिया हा दक्षिण कोरियाच्या तुलनेत किती मागासलेला आहे याची जगभर उत्सुकता आहे, तर उत्तर कोरियाबरोबरही थोडय़ा प्रमाणात व्यापार चालत असावा. पश्चिम जर्मनी आणि पूर्व जर्मनी यांचे एकत्रीकरण झाले तेंव्हा या दोन्ही जर्मनीमध्ये पूर्व जर्मनी हा बराच मागासलेला होता असे दिसून आले होते.

उत्तर कोरिया हा एक गूढ देश राहिलेला आहे. त्या देशाची अंतर्गत माहिती कोठेही उपलब्ध होत नाही. उत्तर कोरियातून दक्षिण कोरियामध्ये आश्रय घेतलेल्या आणि नंतर अमेरिकेत आलेल्या मूळ उत्तर कोरियन असणाऱया योंमी पार्क यांनी लिहिलेल्या ‘इन ऑर्डर टू लीव्ह’ या पुस्तकामधून ही माहिती समोर येते. उत्तर कोरिया हा दक्षिण आशियातील एक देश असल्याने हिंदुस्थानींना ही माहिती असणे आवश्यक आहे. कोरियाच्या ‘वोन’ या चलनाचीही अनेक जणांना माहिती असण्याची शक्यता नाही. उत्तर कोरियामधील एका जिह्यातून दुसऱया जिह्यामध्ये/शहरामध्ये जावयाचे असेल तर परवाना काढावा लागतो. हे अजब वाटले तरी सत्य आहे.

अगदी हीच गोष्ट चीनमध्येही आढळते. चीनमधील छोटय़ा खेडय़ांमधून ‘बीजिंग’ आणि ‘शांघाय’सारख्या मोठय़ा शहरात कामाच्या शोधात येणाऱयांना त्या शहरात कामासाठी परवाना काढावा लागतो. तो परवाना ठरावीक कालावधीसाठीच असतो. त्या परवान्याशिवाय या मोठय़ा शहरांमध्ये रेशन आणि इतर सुविधा मिळत नाहीत. दिलेला परवाना त्या शहरापुरताच मर्यादित असतो. दुसऱया शहरात कामासाठी जावयाचे असेल तर वेगळा परवाना काढावा लागतो. कामाच्या शोधात चीनमधील मोठय़ा शहरात येणारे कामगार अत्यंत हलाखीमध्ये राहतात असे सांगतात.

उत्तर कोरिया हा गरीब देश नसून तेथील राज्यकर्ते लोकांच्या अन्न/धान्य पुरवठय़ावर होणारा आवश्यक खर्च न करता तो ‘क्षेपणास्त्रे’ आणि इतर आयुधे बनविण्यावर करत असल्याने ही गरिबी तेथील जनतेच्या माथी आलेली आहे. सिक्रेट सोसायटी म्हणून गणल्या जाणाऱया ‘इल्लूमिनाती’ या जगातील सर्वात श्रीमंत लोकांच्या समूहाचीही ‘वन वर्ड, वन ऑर्डर’ (वन करन्सी) ही संकल्पना असल्याचे सांगितले जाते. या संकल्पनेत लोकांनी विचारच करू नये अशी अपेक्षा सांगितली जाते. या संकल्पनेत ‘उत्तर कोरियाचे’ मॉडेल बऱयाच प्रमाणात फिट बसताना दिसते.
उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जाँग यून यांनी 2022 या नव्या वर्षात अन्न सुरक्षा व आर्थिक विकासावर भर देण्यात येईल अशी घोषणा नुकतीच केली आहे. आतापर्यंत आपल्या भाषणांमध्ये अण्वस्त्र्ानिर्मिती तसेच दक्षिण कोरियाला युद्धाच्या धमक्या देणाऱया किम जोंग यून यांच्यात झालेला हा बदल लक्षवेधी ठरतो. 2021 सालातील परिस्थिती अतिशय खडतर होती व पुढील काळात आपली राजवट अन्नधान्याची समस्या सोडविण्यासाठी प्राधान्य देईल असे किम जोंग यून यांनी म्हटले आहे. अन्न सुरक्षा व आर्थिक विकासाला प्राधान्य देण्याचे संकेत हे उत्तर कोरियातील अधिकाधिक बिघडत्या व भयावह स्थितीचे निदर्शक असू शकतात असा अनेक आंतरराष्ट्रीय विश्लेषकांचा दावा आहे, पण उत्तर कोरियातील परिस्थिती एवढी बिकट असतानाही किम जोंग युन यांची ‘क्षेपणास्त्र्ाs’ उडवायची खुमखुमी संपत नाही हेही तितकेच खरे. उत्तर कोरियाचे सध्याचे सत्ताधीश किम जोंग युन यांच्या पिताश्रींच्या म्हणजे किम जोंग यांच्या पुण्यतिथीनिमित्त संपूर्ण उत्तर कोरियामध्ये नुकताच तेथील सरकारी आदेशाने ‘सार्वजनिक दुखवटा’ पाळण्यात आला होता. हा दुखवटा चक्क सलग 11 दिवस पाळण्याबद्दल तेथील प्रशासनाकडून आदेश काढण्यात आलेले होते. सर्व सार्वजनिक मनोरंजनाच्या कार्यक्रमांवर या 11 दिवसांच्या काळात बंदी घालण्यात आलेली होती. कोणत्याही प्रकारच्या हसण्याला बंदी घालण्यात आलेली होती. त्यामुळे सतत 11 दिवस 24 तास रडक्या तोंडाने तेथील जनता वावरताना दिसली. ‘किम जोंग युन’ यांच्या पिताश्रींच्या 1994 ते 2011 पर्यंत उत्तर कोरियावर सत्तेचा अंकुश ठेवला होता.