
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या भावामुळे मेटाकुटीला आलेल्या देशवासीयांना केंद्रीय अर्थ मंत्री अरुण जेटली यांनी अगोदर प्रामाणिकपणे कर भरा, असा सल्ला दिला आहे. पेट्रोल-डिझेलमध्ये कोणत्याही कर सवलती देण्यास जेटली यांनी स्पष्ट नकार दिल्याने महागाईचा वणवा असाच भडकत राहणार आहे.
केंद्रीय अर्थ मंत्री अरुण जेटली यांनी आपल्या फेसबूक पेजवर एक पोस्ट लिहिली आहे. यात त्यांनी देशातील नागरिकांनी अगोदर प्रामाणिकपणे कर भरावा, असे म्हटले आहे. फक्त पगारदारच कर भरतात, बाकीच्यांनीही कर भरण्यात इमानदारी दाखवावी. त्यामुळे पेट्रोलियम पदार्थांवरील करभार हलका करण्यास मदत होईल. हा सल्ला देत असतानाच त्यांनी पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या किमती नियंत्रणात आणण्यासाठी कोणत्याही प्रकारचे कर कमी करण्यात येणार नाहीत, असेही निक्षून सांगितले.
























































