दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्री निवासस्थान रिकामे केले आहे. दिल्लीतल्या फ्लॅगस्टाफ मार्गावर असलेले हे घर त्यांनी सोडले असून ते आता ल्युटियन्स दिल्लीतल्या नवीन घरासाठी रवाना झाले आहेत.
केजरीवाल जी ने छोड़ा मुख्यमंत्री आवास….🙏
अब जब तक जनता की अदालत में जनता उनकी ईमानदारी पर मुहर लगाकर उन्हें फिर से मुख्यमंत्री नहीं बनाती तब तक मुख्यमंत्री आवास में नहीं रहेंगे पूर्व CM अरविंद केजरीवाल जी। pic.twitter.com/2oSJy26EVq
— AAP (@AamAadmiParty) October 4, 2024
अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाजा राजीनामा दिला होता. त्यानंतर केजरीवाल मुख्यमंत्री आवास सोडतील अशी चर्चा होती. अखेर शुक्रवारी त्यांनी हे घर रिकामे केले. जेव्हा केजरीवाल यांनी हे घर सोडलं तेव्हा ते खुप भावूक झाले होते.
केजरीवाल यांनी जेव्हा घर सोडलं तेव्हा आपल्या वडिलांचा हात धरला होता. केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांनी घराच्या चाव्या कर्मचाऱ्यांकडे दिल्या. तर केजरीवाल यांनी जाताना कर्मचाऱ्यांना मिठी मारून निरोप घेतला.