आशेळेकरांचा पाण्यासाठी केडीएमसीवर हंडा मोर्चा; शिवसेनेच्या नेतृत्वाखाली हजारो नागरिकांची धडक, गगनभेदी घोषणा आणि हातात फलक, बनवाबनवी करू नका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील आशेळेगाव परिसरात अनेक महिन्यांपासून व पाणीटंचाई आहे. पाण्याची समस्या सोडवण्यात पालिका प्रशासन अपयशी ठरल्याने आज संतप्त झालेल्या गरिकांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नेतृत्वाखाली केडीएमसी मुख्यालयावर हंडा मोर्चा काढला. जारो नागरिकांनी रिकामे हंडे आणि बादल्या घेऊन पालिकेवर धडक दिली. हातात फलक घेत’ बनवाबनवी नको पाणी ‘अशा गगनभेदी घोषणा देत प्रशासनाला धारेवर धरले. आशेळे पाड्यातील नागरिकांना गेल्या अनेक महिन्यांपासून णीटंचाईचा गंभीर सामना करावा लागत आहे. पूर्वी आठवड्यातून चार वेळा पाणीपुरवठा होत होता. मात्र आता आठ-दहा दिवस उलटूनही अनेक भागांत पाणी येत नाही. पाणी नसल्याने नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. घरातील बमे आणि रोजगार बाजूला ठेवून नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. आर्थिक भुर्दंड सहन करून ण्याचे पाणी विकत घ्यावे लागत आहे. पालिका प्रशासन ढिम्म असल्याने अखेर आज मोर्चा काढण्यात आला. वसेना नगरसेविका अॅड. किर्ती ढोणे आणि विभागप्रमुख शुभम ढोणे यांनी मोर्चाचे नेतृत्व केले.

मुबलक पाणी देऊ प्रशासनाचे लेखी आश्वासन
जोपर्यंत आम्हाला मुबलक आणि नियमित पाणीपुरवठ्याबाबत लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत येथून हलणार नाही, असा आक्रमक पवित्रा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी घेतल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली. अखेर प्रशासनाने लेखी आश्वासन दिल्यानंतर ठिय्या आंदोलन मागे घेतले. मात्र आश्वासनानंतरही प्रत्यक्षात पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही तर यापेक्षाही ताव्प आंदोलन करण्याच इशारा शिवसैनिकांनी यावेळी दिला.

आयुक्तांच्या दालनाबाहेर ठिय्या
मोर्चावेळी शिवसेना नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी पालिका आयुक्त अभिनव गोयल यांची भेट घेऊन आशेळे, चिंचपाडा ते चक्की नाका परिसरातील पाणीटंचाईची माहिती दिली. मात्र अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तर मिळत नसल्याचा आरोप करत शिवसेना गटनेते उमेश बोरगावकर, नगरसेवक राहुल कोट, अॅड. किर्ती ढोणे, तेजश्री गायकवाड, नीलेश खंबायत, अपर्णा भोईर, स्वप्नाली केणे, अॅड. वंदना महिले, विशाल गारवे, विभागप्रमुख शुभम ढोणे यांनी आयुक्तांच्या दालनाबाहेर ठिय्या दिला.

पाणीटंचाईसंदर्भात महापालि का प्रशासनाकडे अनेक वेळा लेखी आणि तोंडी पाठपुरावा केला. मात्र वारंवार तक्रारी करूनही परिस्थितीत कोणतीही सुधारणा होत नसल्याने प्रशासनाला वठणीवर आणण्यासाठी मोर्चा काढावा लागला.
– अॅड. किर्ती ढोणे,
शिवसेना नगरसेविका.