अश्विनी बिद्रे हत्या प्रकरण अभय कुरुंदकर अखेर बडतर्फ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, नवी मुंबई

सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे यांच्या हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी असलेला वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर याला अखेर पोलीस सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. उशिरा का होईना कुरुंदकर याला थेट सस्पेंड केले असून अद्यापि अश्विनी बिद्रे यांचा मृतदेह हाती लागलेला नाही.

अश्विनी बिद्रे यांच्या हत्येनंतर गेल्या वर्षी ७ डिसेंबर रोजी अभय कुरुंदकर याला अटक करण्यात आली. कुरुंदकर हा गृहखात्याचा जणू लाडका असल्याची टीकादेखील झाली होती. अटकेनंतर तब्बल १२ दिवसांनी त्याला निलंबित करण्यात आले. कुरुंदकर यास गृहखात्याने गेल्या महिन्यामध्येच बडतर्फ केले असून याबाबत कमालीची गुप्तता बाळगली होती.