
वजिराबाद गवळीपुरा परिसरात स्वतःच्या घरासमोरील जागेत बोअर पाडण्यास विरोध करत आणि जातीवाचक शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी दहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वजिराबाद पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गंभीर कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे. दलित संघटनांनी या घटनेचा निषेध करुन आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे.

























































