डॉक्टरांवर हल्ला; 7 वर्षांची शिक्षा, राज्यसभेत विधेयक मंजूर

‘महामारी रोग संशोधन विधेयक 2020’ राज्यसभेत मंजूर केले. या विधेयकानुसार महामारीच्या काळात डॉक्टरांवर हल्ले करणाऱयांविरोधात 7 वर्षांची शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. त्याशिवाय हल्ला करणाऱयांना 50 हजार ते 2 लाखपर्यंत दंडाची तरतूददेखील करण्यात आली आहे.

पैशाच्या जोरावर राज्य सरकारे अस्थिर करू नका, शिवसेनेचा टोला
कोरोनाच्या भीषण महामारीशी देशातला सामान्य माणूस प्राणपणाने लढत असताना केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार या नागरिकांना दिलासा देण्याऐवजी विविध राज्यातील सरकारे अस्थिर करून ती पाडण्यात मग्न आहे. केंद्र सरकार पैशाच्या जोरावर हे सत्तेचे प्रयोग करत आहे. त्यापेक्षा सरकारने या धनबळाचा वापर पीएम केअर फंडाच्या माध्यमातून गोरगरीबांसाठी आणि कोरोनाग्रस्तांसाठी करावा, असा टोला शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी राज्यसभेत बोलताना लगावला.

आपली प्रतिक्रिया द्या