संभाजीनगरमध्ये पहिल्याच दिवशी चार जणांचे अहवाल निगेटिव्ह

904

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात शनिवारी व्हीआरडीएल लॅब कार्यान्वित झाली आहे. व्हीआरडीएल मशीनवर पहिल्याच दिवशी चार स्वॅब नमुन्याच्या तपासण्या करण्यात आल्या. या चारही स्वॅबचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

चार स्वॅबमध्ये दोन स्वॅब नमुने हे जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून पाठविण्यात आले होते. यातील एक स्वॅब हा खासगी रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या एका संशयिताचा आहे. तर उर्वरित दोन स्वॅब हे घाटी रुग्णालयातील संशयितांचे आहेत.

दरम्यान, जिल्हा रुग्णालयातर्फे आज 42 वर्षीय महिलेची तपासणी करून स्वाब घेण्यात आला असून तिला ऍडमिट करून घेण्यात आले. एका 62 वर्षीय इसमास ढकल करून त्याचा स्वब घाटी रुग्णालयाच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आला आहे. एका 23 वर्षीय गरोदर महिलेस दाखल करून घेण्यात आले असून तिला घाटी रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे. आता केवळ एक 42 वर्षीय महिलेस ऍडमिट करून घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

घाटीत न्युमोनियामुळे एका महिलेचा आज मृत्यू झाला आहे. बुलढाणा येथील ही महिला शुक्रवारी रात्री घाटीत भरती झाली होती. तिला कोरोनाचा अहवाल निगेटीव्ह आला होता. या महिलेला न्युमोनिया झाला होता. तिला सिव्हीटीसच्या इमारतीत दाखल करण्यात आलेले होते. शनिवारी त्यांचा मृत्यु झाला असल्याची माहिती वैद्यकीय अधिक्षक डॉ सुरेश हरबडे यांनी दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या