
जर्मनीची लग्झरी कार बनवणारी कंपनी ऑडीने 2023च्या पहिल्या तिमाहीचा सेल्स रिपोर्ट जारी केला आहे. रिपोर्टच्या माहितीनुसार, जानेवारी ते मार्च या कालावधीमध्ये तब्बल 1 हजार 950 युनिट्सची विक्री झाली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीमध्ये फक्त 862 युनिट्सची विक्री झाली होती. यंदा विक्रीमध्ये तब्बल 126 टक्क्यांची वाढ नोंद करण्यात आली असून आगामी काळामध्येही यात वाढ दिसण्याची शक्यता आहे.
पहिल्या तिमाहीमधील विक्रीचे खास वैशिष्ट्य म्हणजे यातील 60 टक्क्यांहून अधिक योगदान एसयूव्ही गाड्यांचे आहे. ऑडी अप्रूव्ह्डसह ऑडीच्या फुली इलेक्ट्रिक कार पोर्टफोलिओसह स्पोर्ट कार, ऑडी आरएस ई-ट्रॉन जीटी व ऑडी ई-ट्रॉन जीटी या गाड्यांना बाजारात मोठी मागणी आहे. यासह ऑडी क्यू7, ऑडी क्यू8 व ऑडी ए8 एल यांनीही चांगली कामगिरी केली आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी पहिल्या तिमाहीत आम्ही विक्रीत 126 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. सध्या आमच्या लाईन-अपमध्ये 16 मॉडेल्सचा समावेश आहे. नुकत्याच लॉन्च करण्यात आलेल्या ऑडी क्यू3 व ऑडी क्यू3 स्पोर्टबॅकला देशभरातून मागणी असून आगामी काळात आम्ही आणखी चांगली कामगिरी करू, असे ऑडी इंडियाचे प्रमुख बलबीर सिंग धिल्लो म्हणाले.
ऑडी इंडियाच्या लाईन-अपमधील मॉडेल्स –
ऑडी ए4, ऑडी ए6, ऑडी ए8 एल, ऑडी क्यू3 स्पोर्टबॅक, ऑडी क्यू5, ऑडी क्यू7, ऑडी क्यू8, ऑडी एस5 स्पोर्टबॅक, ऑडी आरएस5 स्पोर्टबॅक, ऑडी आरएस क्यू8, ऑडी ई-ट्रॉन 50, ऑडी ई-ट्रॉन 55, ऑडी ई-ट्रॉन स्पोर्टबॅक 55, ऑडी ई-ट्रॉन जीटी आणि ऑडी आरएस ई-ट्रॉन जीटी.
























































