Mahindra Thar साठी लागली 1.11 कोटींची बोली, 2 ऑक्टोबरपासून बुकिंग सुरू

वाहन निर्माता कंपनी महिंद्राने आपल्या 75 व्या स्थापना दिनानिमित्त Mahindra Thar 2020 लॉन्च करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने पहिल्यांदा 2010 मध्ये Thar हिंदुस्थानात लॉन्च केली होती. यानंतर कंपनीने 2020 मध्ये डिझाइन अपडेट करून Thar पुन्हा लॉन्च केली आहे.

लाँचिंगआधीच सेकेंड जनरेशन Mahindra Thar च्या पहिल्या कारचा लिलाव केला जात आहे. ज्यामध्ये दिल्लीच्या आकाश मिंडा नावाच्या व्यक्तीने 1.11 कोटी रुपये बोली लावून पहिली Mahindra Thar 2020 आपल्या नावावर केली आहे. या कारच्या लिलावातून मिळणारी रक्कम कोरोना संकटात काम करणाऱ्या तीन संस्थांना दान म्हणून दिली जाणार आहे. ज्यात नांदी फाउंडेशन, देश फाउंडेशन आणि पीएम केअर फंड यांचा समावेश आहे. यामधील कोणत्या संस्थेला ही रक्कम दान करायची याचा निर्णय विजेता घेणार आहे. या लिलावात जवळपास पाच हजार जणांनी सहभाग घेतला होता.

Mahindra Thar ची 2 ऑक्टोबरपासून बुकिंग सुरु होणार आहे. महिंद्राच्या डीलर्सच्या मते, Thar डिलिव्हरी ऑक्टोबरच्या अखेरीस सुरू होईल. Mahindra Thar ला कंपनीने दोन इंजिन पर्याय, 2.0-लीटर mStallion TGDi पेट्रोल इंजिन आणि 2.2-लिटर mHawk डिझेल इंजिनसह लॉन्च केले आहे. यासह, या कारमध्ये 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर स्वयंचलित ट्रांसमिशन आणि 6-स्पीड मॅन्युअल ट्रांसमिशनचे पर्याय देण्यात आले आहेत.

रंग पर्याय आणि व्हॅरिएंट

नवीन मोहिंदर Thar सहा रंग पर्याय रेड रेज, मिस्टिक कॉपर, नेपोली ब्लॅक, एक्वामारिन, गॅलेक्सी ग्रे आणि रॉकऑन बेजमध्ये उपलब्ध असेल. तसेच, एक्स आणि एलएक्स या दोन व्हॅरिएंटमध्ये कंपनी ही कार लॉन्च केली आहे. हिंदुस्थानी बाजारात याची किंमत 10 लाख ते 15 लाख रुपये असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या