Tata Tigor Electric ‘या’ दिवशी होणार लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशातील प्रसिद्ध वाहन निर्माता कंपनी टाटा मोटर्स लवकरच आपली नवीन Tata Tigor Electric हिंदुस्थानात लॉन्च करणार आहे. ही कार 31 ऑगस्ट रोजी अधिकृतपणे लॉन्च केली जाणार आहे. ज्यासाठी काही निवडक डीलरशिपवर बुकिंग देखील सुरू झाली आहे. लॉंचच्या आधी या कारची काही माहिती समोर आली आहे. ज्याबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Tata Tigor च्या आतील भागात आरामदायक सीट व्यतिरिक्त जबरदस्त हेडरुम आणि लेगरूम दिले जाणार आहे. Tigor EV मध्ये रिमोट कमांड आणि रिमोट डायग्नोस्टिक्ससह 30+ कनेक्ट कार फीचर्स दिले जाणार आहे. जेणेकरून ग्राहक त्यांच्या फोनद्वारे त्यांच्या कारशी कनेक्ट राहू शकतील.

Tigor EV मध्ये IP 67 रेटेड बॅटरी पॅक आणि मोटर देण्यात येणार असून हे 8 वर्षे आणि 160,000 KM बॅटरी आणि मोटर वॉरंटीसह येते. यात दिली जाणारी मोटर 55 किलोवॅटची पीक पॉवर आउटपुट आणि 170 एनएमची पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. तसेच ही कार 5.7 सेकंदात 0 ते 60 किमी प्रति तास वेग प्राप्त करते. याची बॅटरी 60 मिनिटांपेक्षा कमी वेळात 80 टक्के चार्ज होऊ शकते. कंपनीने अद्याप याच्या किंमतीबद्दल कोणतीही अधिकृत माहिती जाहीर केलेली नाही. मात्र याची किंमत Nexon EV कारपेक्षा कमी असू शकते.