
सामना प्रतिनिधी । श्रीरामपूर
केंद्र सरकारच्या इंडियन इन्स्टीट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अॅण्ड रिसर्च (आयसर) ने घेतलेल्या परिक्षेत पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयाचा विद्यार्थी अवधूत संदीप जाधव हा विद्यार्थी ओबीसी वर्गातून हिंदुस्थानात पहिला आला.
बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ही देश पातळीवरील परिक्षा होती. या परिक्षेचा निकाल नुकताच लागला. ओबीसी प्रवर्गातून देशात पहिला येण्याचा मान अवधूत याला मिळाल्याने त्यास एआयआर मानांकन मिळाले. त्याला दरमहा ८० हजार रूपयांची शिष्यवृत्ती मिळणार आहे. अवधूत हा प्रा. उज्वला जाधव व अभियंता संदीप जाधव यांचा मुलगा. येथील पत्रकार मनोज आगे, बाळासाहेब आगे, अॅड. कैलास आगे यांचा तो भाचा आहे.
































































