अयोध्येचा ऐतिहासिक निकाल देणाऱ्यात दोन मराठी न्यायाधीश! वाचा सविस्तर…

1210

गेल्या अनेक दशकांपासून सुरू असलेला अयोध्येतील बहुचर्चित खटल्याचा 9 नोव्हेंबरला अंतिम निकाल लागला. रामजन्मभूमीची जागा ही प्रभू श्रीरामाची अर्थात रामलल्लाचीच असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. तसेच सुन्नी वक्फ बोर्डाला इतरत्र पाच एक जागा देण्याचा आदेशही दिला. सरन्यायाधीश रंजन गोगोई आणि त्यांच्या खंडपीठाने हा ऐतिहासिक निर्णय दिला.

अयोध्या प्रकरणाची अंतिम सुनावणी 5 ऑगस्टपासून सुरू झाली. हिंदू आणि मुस्लिम पक्षकारांनी आपली बाजू मांडल्यानंतर तब्बल 40 दिवसानंतर सुनावणी पूर्ण झाली आणि न्यायालयाने निर्णय राखून ठेवला. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यासह न्यायाधीश शरद बोबडे, न्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड, न्यायाधीश अशोक भूषण, न्यायाधीश एक अब्दुल नजीर यांच्या खंडपीठाने 9 नोव्हेंबरला अंतिम निर्णय सुनावला. राम जन्मभूमीचा हा ऐतिहासिक निर्णय देणारे खंडपीठातील हे पाच न्यायाधीश कोण आहेत जाणून घेऊया…

सरन्यायाधीश रंजन गोगोई –
रंजन गोगोई हे सर्वोच्च न्यायालयाचे 46 वे सरन्यायाधीश आहेत. गोगोई हे अयोध्या प्रकरणी तयार करण्यात आलेल्या घटनापीठाचे अध्यक्षही आहेत. सरन्यायाधीशपदावर असताना निवडणूक ते आरक्षण सुधारणा यासारथ्या अनेक महत्त्वाच्या प्रकरणांच्या निर्णय प्रक्रियेत गोगोई सहभागी होते.

आनंद साजरा करण्यासाठी पुन्हा अयोध्येला जाणार! – उद्धव ठाकरे

न्यायाधीश शरद बोबडे –
सरन्यायाधीश रंजन गोगोई यांचा कार्यकाळ संपल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचे पुढील सरन्यायाधीश म्हणून मराठमोळ्या शरद बोबडे यांची नियुक्ती होणार आहे. 47 वे सरन्यायाधीश म्हणून ते शपथ घेतील. बोबडे यांनी अयोध्या प्रकरणातही महत्त्वाची भूमिका निभावली.

#AyodhaVerdict 1528 ते 2019, वाचा ऐतिहासिक न्यायालयीन लढ्याचा घटनाक्रम

न्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड –
13 मे, 2016 रोजी डी. वाय, चंद्रचूड यांची सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशपदी नियुक्ती झाली. यापूर्वी ते अलाहाबाद उच्च न्यायालय व मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश पदावर कार्यरत होते. त्यांचे वडील वाय. व्ही. चंद्रचूड हे माजी सरन्यायाधीश होते.

#AyodhaVerdict – न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत! वाचा दिग्गजांच्या प्रतिक्रिया

न्यायाधीश अशोक भूषण –
सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश पदावर रूजू होण्यापूर्वी अशोक भूषण हे अलाहाबाद उच्च न्यायालयात न्यायाधीश पदावर कार्यरत होते. त्यानंतर त्यांनी काही काळ केरळ उच्च न्यायालय न्यायाधीश होते. 2016 पासून ते सर्वोच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश म्हणून कार्यरत आहेत.

‘बाबरी’खाली मंदिराचे अवशेष शोधून काढले, के. के. मुहम्मद यांचे महत्त्वपूर्ण योगदान

न्यायाधीश एस. अब्दुल नजीर –
अयोध्या निकाल प्रकरणाच्या घटनापीठात न्यायाधीश एस. अब्दुल नजीर हे सदस्य होते. 1983 मध्ये त्यांनी कर्नाटक उच्च न्यायालयात प्रॅक्टिस सुरू केली. 2003 मध्ये त्यांची अतिरिक्त न्यायाधीशपदी नियुक्ती झाली आणि त्यानंतर ते सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून रुजू झाले.

#AyodhaVerdict वय 92 वर्षे, 40 वर्षांचा लढा!

आपली प्रतिक्रिया द्या