बदलापूर शहरातील आदर्श शाळेत चार वर्षांच्या दोन मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास समितीत स्थापन करण्यात येणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत निर्देश दिले आहेत. पोलीस महानिरीक्षक दर्जाच्या वरिष्ठ IPS अधिकारी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती काम करणार आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाने याबाबत ट्विट करत माहिती दिली आहे. ”बदलापूर येथील दुर्दैवी घटनेची चौकशी करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस महानिरीक्षक दर्जाच्या वरिष्ठ IPS अधिकारी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेखाली SIT गठित करण्याचे आदेश दिले आहेत. दोषींवर कठोरातील कठोर कारवाई करण्यासाठी, हा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यासाठी आजच प्रस्ताव सादर करण्याचे आदेश ठाणे पोलीस आयुक्तांना सुद्धा त्यांनी दिले आहेत”, असे ट्विट देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाकडून करण्यात आली आहे.