बँकेत नोकरी मिळताच उडवले 62 लाख, खरेदी केली लग्जरी कार

1387

झटपट श्रीमंत होण्यासाठी अनेकजण वेगवेगळे मार्ग स्विकारत असतात. पण अमेरिकेत एका 29 वर्षीय रॅपर अर्लान्डो हेन्डरसन या तरुणाने यासाठी चक्क बँकेत नोकरी मिळवली. बँकेत असलेले एवढे पैसे बघून त्याची नियतही फिरली. मग काय त्याने बँकेतून 65 लाख रुपये लंपास केले. त्या पैशातून लग्जरी कार, दागिने, महागडे घर विकत घेतले. आपली ही श्रीमंती त्याने सोशल मीडियावर पोस्ट केली. त्यामुळे बँकेला संशय आला व त्यांनी पोलिसात कळवले. त्यानंतर अर्लान्डोला ताब्यात घेण्यात आले असता एवढा पैसा बघून आपल्याला झटपट श्रीमंत होण्याची इच्छा झाली. असे सांगत त्याने चोरी केल्याची कबुली दिली.

अमेरिकेतील कॅरोलिनामद्ये अर्लान्डो राहतो. त्याला कमी वेलात भरपूर पैसा कमवायचा होता. त्यामुळे तो रॅपर झाला. पण त्यात यश मिळत नसल्याने त्याने ‘वेल्स फार्गो बँके’त नोकरी मिळवली. पण दिवसभर काम करुनही हवा तेवढा पैसा मिळत नसल्याने तो निराश होता. त्यातूनच त्याने एक शक्कल लढवली. तो बँकेतून रोज थोडे थोडे पैसे चोरू लागला. त्यापैशातून त्याने आलिशान घर खरेदी केले. लग्जरी कार विकत घेतली. नंतर त्याने शहरातील उच्चभ्रूंच्या वसाहतीत घर घेतले. त्यानंतर त्याने नवीन घरातले, फर्निचरचे, कारचे फोटो सोशल मीडीयावर पोस्ट केले. पण बँके मॅनेजरचे त्याच्याकडे सुरुवातीपासूनच लक्ष होते. त्यामुळे दिवसागणिक त्याच्या राहणीमानात पडलेला फरक बघून त्या पोलिसाने पोलिसाने काहीतरी गडबड असल्याचे कळवले. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. तेव्हा त्याने गुन्हा कबूल केला.

आपली प्रतिक्रिया द्या