शिवडीत महिला, दिव्यांगांसाठी स्वच्छ, सुंदर शौचालय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवडीमध्ये महिला व दिव्यांगांसाठी विशेष व्यवस्था असणारे स्वच्छ आणि सुंदर शौचालय तयार करण्यात आले आहे. या शौचालयात 31 शौचकुपांची व्यवस्था करण्यात आली आहे. शिवसेना नगरसेवक सचिन पडवळ यांच्या प्रयत्नाने हे शौचालय उभारण्यात आले आहे.

शिवडी कोळसा बंदर येथे बांधण्यात आलेले महिला व दिव्यांगांसाठी विशेष व्यवस्था असणारे हे शौचालय सुरेखपणे रंगवण्यात आले आहे. शौचालयात 24 तास पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. येत्या 15 दिवसांत या शौचालयाचे लोकार्पण करण्यात येणार आहे. आगामी काळात शिवडी विभागात अशाच प्रकारे विविध संकल्पना घेऊन शौचालय उभारण्यात येतील असे पडवळ यांनी सांगितले. या अनोख्या संकल्पनेसाठी खासदार अरविंद सावंत, आमदार अजय चौधरी, शिवसेना विभागप्रमुख आशीष चेंबूरकर आदींचे सहकार्य लाभले आहे. पालिका एफ/दक्षिण विभागाचे सर्व अधिकारी व निर्मिती आर्टस्चे प्रथमेश पाडेकर यांचे सहकार्य लाभले आहे.