प्रिव्ही स्पेशालिटी केमिकल्समध्ये पगारवाढ, भारतीय कामगार सेनेचा यशस्वी करार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाड येथील प्रिव्ही स्पेशालिटी केमिकल्समधील कामगारांना भरघोस पगारवाढ मिळणार आहे. भारतीय कामगार सेनेने याबाबत व्यवस्थापनासोबत यशस्वी करार केला असून कामगार वर्गात उत्साहाचे वातावरण पसरले आहे.

शिवसेना नेते भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष, खासदार अरविंद सावंत आणि कार्याध्यक्ष अजित साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली हा करार झाला.

यावेळी भारतीय कामगार सेनेच्या वतीने संयुक्त सरचिटणीस दिलीप जाधव, उदय शेटये, सहचिटणीस संतोष कदम, कार्यकारिणी सदस्य दिलीप पवार उपस्थित होते. कंपनी व्यवस्थापनाच्या वतीने व्यवस्थापक राम सुर्वे, फॅक्टरी हेड सलीम शिरखोत यांनी तर भारतीय कामगार सेनेच्या वतीने युनिट अध्यक्ष राजेश सुकूम, उपाध्यक्ष नितीन दोशी, सचिव अजित मोरे, खजिनदार राकेश उतेकर यांनी स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी अनिल गोलंबडे, रणजीत आंब्रे, किशोर दळवी उपस्थित होते.