भाषा जनाची, भाषा मनाची; मराठी भाषा विभागाचे घोषवाक्य

मराठी भाषेचे संवर्धन, प्रचार आणि प्रसार करण्यासाठी राज्याच्या मराठी भाषा विभागाने पुढाकार घेतला असून त्याचाच एक भाग म्हणून मराठी भाषा विभागाचे बोधचिन्ह आणि घोषवाक्य तयार करण्यात आले आहे. मराठी भाषा विभागाकडून मराठी भाषेचा प्रचार-प्रसार आणि संवर्धनाच्या दृष्टीने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा, वाचन प्रेरणा दिन, मराठी भाषा गौरव दिन असे विविध उपक्रम आयोजित करण्यात येतात. हे उपक्रम लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी आकर्षक भित्तिपत्रकांचा उपयोग होतो. पण मराठी भाषा संवर्धनाचा संदेश व ओळख अधिक प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी बोधचिन्ह व घोषवाक्य तयार करण्याची मराठी भाषा विभागाची योजना होती. त्यानुसार मराठी भाषा विभागाने बोधचिन्ह व ‘भाषा जनाची-भाषा मनाची’ हे घोषवाक्य तयार केले आहे. आता मराठी भाषा विभागाच्या सर्व कार्यक्रमांमध्ये या घोषवाक्याचा वापर करण्याचा निर्णय मराठी भाषा विभागाने घेतला आहे.