मला चार वर्षांपूर्वीच संकेत मिळाले होते…, पुनरागमनाच्या चर्चांवर भुवनेश्वर कुमारने केली भूमिका स्पष्ट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एकेकाळी टीम इंडियाच्या गोलंदाजीचा मजबूत कणा म्हणून भुवनेश्वर कुमारच्या नावाचा उल्लेख केला जायचा. संघाला धडाकेबाज सुरुवात करुण देण्यात त्याचा हातखंडा होता. मात्र, 2022 च्या टी20 विश्वचषकानंतर तो संघातून बाहेर पडला आणि त्यानंतर आजतागायत त्याला संघात स्थान मिळालेलं नाही. मात्र, आता त्याच्या पुनरागमनाची चर्चा जोर धरू लागली आहे. चाहत्यांकडून त्याला पुन्हा टीम इंडियात खेळवण्याची मागणी होत आहे. मात्र, या सर्व चर्चांवर स्वतः भुवीने मोठे भाष्य केलं आहे.

यूपी टी20 लीग 2026 आणि आयपीएलमध्ये आरसीबीसाठी चमकदार कामगिरी करत भुवनेश्वर कुमार आपलं नाणं अजूनही खणखणीत असल्याचं दाखवून दिलं आहे. त्यामुळे चाहत्यांनी त्याच्या पुनरागमनाची मागणी केली आहे. परंतू या सर्व चर्चा आणि मागण्यांवर त्याने आपली भुमिका स्पष्ट केली आहे. देशासाठी पुन्हा खेळण्यास उत्सुक असलो तरी आता मी भविष्याचा फारसा विचार करत नसल्याचे स्पष्ट केले आहे. प्रसिद्ध समालोचक जतिन सप्रू यांच्या यूट्यूब चॅनलवर बोलताना भुवनेश्वरने मोठा खुलासा केला आहे. ऑस्ट्रेलियात पार पडलेला 2022 चा टी20 विश्वचषक हा आपला हिंदुस्थानकडून खेळलेला अखेरचा वर्ल्ड कप असेल, याची जाणीव त्याला चार वर्षांपूर्वीच झाली होती. एडिलेडमधील पराभवानंतर हॉटेलच्या खोलीत आल्यावरच त्याने पत्नी नुपूरला, “आपली टीम इंडियातील वेळ आता संपली आहे,” असे सांगितले होते.

AUS Vs ZIM – फक्त 207 सामने खेळणाऱ्या झिम्बाब्वेच्या ब्रेंडन टेलरने सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला

मोठ्या स्पर्धा हारल्यानंतर निवडकर्त्यांचा दृष्टिकोन बदलतो आणि ते नेहमीच नवीन खेळाडूंना संधी देण्याचा विचार करतात, याची पूर्ण जाणीव आपल्याला अनुभवावरून झाल्याचे भुवीने नमूद केले. हिंदुस्थानसाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये गाजलेल्या भुवनेश्वरने 21 कसोटी, 121 वनडे आणि 87 टी20 सामन्यांत एकूण 294 आंतरराष्ट्रीय विकेट्स आपल्या नावावर केले आहेत.