दिल्लीतील आर्मी पब्लिक स्कूलला बॉम्बची धमकी, शाळेत घबराटीचे वातावरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिल्लीतील आर्मी पब्लिक स्कूलला मंगळवारी फोनद्वारे बॉम्बची धमकी मिळाल्याने एकच खळबळ उडाली. तात्काळ पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. बॉम्बची माहिती मिळताच पोलीस पथक आणि बॉम्ब निकामी करणारे पथक घटनास्थळी दाखल झाले. संपूर्ण शाळेची कसून तपासणी केली असता हा खोटा कॉल असल्याचे निष्पन्न झाले.

आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, धौला कुआँ येथील आर्मी पब्लिक स्कूलमध्ये मंगळवारी सकाळी सुमारे 11.30 वाजता बॉम्बची धमकी मिळाली. यानंतर शाळेत घबराटीचे वातावरण पसरले. सर्व विद्यार्थ्यांना वर्गांमधून बाहेर काढण्यात आले आणि पोलिसांना माहिती देण्यात आली.

तपासानंतर, पोलीस पथक आणि बॉम्ब निकामी करणाऱ्या पथकाने दुपारी 1 वाजता ही धमकी खोटा कॉल असल्याचे जाहीर केले. पोलीस कॉल करणाऱ्याचा शोध घेत आहेत.