
केसांचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी पार्लरमध्ये जाऊन ट्रिटमेंट घेण्यापेक्षा आपण घरबसल्या सुद्धा केसांची काळजी घेऊ शकतो. धूळ, प्रदूषण आणि हानीकारक केमिकल्समुळे केस रुक्ष होण्यास सुरुवात होते. अशावेळी हेअर स्पा करणं हा एक उत्तम पर्याय मानला जातो. परंतु प्रत्येकवेळी हेअर स्पा करण्यासाठी पार्लरमध्ये जाणे शक्य नसते. अशावेळी आपण घरबसल्या देखील केसांच्या आरोग्यावर काम करू शकतो. काही मूलभूत गोष्टींच्या मदतीने घरच्या घरीही हेअर स्पा करता येतो.
हेअर स्पा करण्यासाठी माइल्ड शॅम्पू हा खूप गरजेचा आहे. त्याचबरोबर स्पा क्रीम, डीम कंडिशनिंग मास्क, कंगवा, टाॅवेल या महत्त्वाची गोष्टी आहेत.
हेअर स्पा करण्याआधी सर्वात आधी शॅम्पूने केस धुणे हे खूप गरजेचे आहे. केस धुताना डोक्यावरील त्वचा सुद्धा चांगली धुवायला हवी. तेल न राहू देता योग्य पद्धतीने त्वचा धुणे गरजेचे आहे. स्पा करण्यासाठी केस कधीही पूर्णपणे कोरडे करू नयेत. त्यानंतर केसांना स्पा क्रीम किंवा डीप कंडिशनिंग मास्क लावावा. स्कॅल्पवर खूप जोराने मसाज करू नये.
एका भांड्यामध्ये पाणी गरम करावे. या पाण्यामध्ये टाॅवेल भिजवावा. त्यानंतर हा टाॅवेल पिळून केसांभोवती गुंडाळावा. पाणी खूप गरम नसावे, अन्यथा भाजण्याचा धोका असतो. केसांभोवती अशा पद्धतीने दोन ते तीन वेळा टाॅवेल पाण्यात भिजवून गुंडाळायला हवा.
केसांना स्टीम घेऊन झाल्यानंतर केस पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने धुवावेत. त्यानंतर केसांना डीप कंडिशनिंग मास्क हा किमान 20 ते 25 मिनिटे लावून ठेवावा. त्यानंतर केस धुवावे. केस धुताना दही, मध किंवा अव्होकॅडो या घटकांचा देखील वापर करू शकता. परंतु कोणत्याही घरगुती मास्कची आधी टेस्ट करणे खूप गरजेचे आहे.
स्टीम केल्यानंतर केस स्वच्छ धुवावेत. त्यानंतर किमान 20 ते 25 मिनिटे केसांवर मास्क तसाच ठेवावा. केस खूप कोरडे किंवा निस्तेज वाटत असतील तर महिन्यातून साधारण एकदा हेअर स्पा करता येतो. मात्र केस गळणे, स्कॅल्पला खाज, जळजळ किंवा इतर समस्या असल्यास तज्ज्ञांचा सल्ला घेणे योग्य ठरेल.
























































