अनसीन अनदेखा… बिचुकलेला मिळाला सल्ला!

60

सामना ऑनलाईन, मुंबई

‘बिग बॉस मराठी’ कार्यक्रमाची रंगत वाढत चालली आहे. वूटवरील ‘अनसीन अनदेखा’च्या नवीन क्लिपमध्ये स्पर्धक माधव देवचके अभिजित बिचुकले याच्या इतरांना जाणूनबुजून स्पर्श करण्याच्या स्वभावाबाबत नाराज होताना दिसत आहे. माधव म्हणतो, ‘‘थोडं टची कमी राहिलेले बेटर. का माहीत आहे का? काही-काही लोकांना सवय नसते, ते इरिटेट होतात.’’ पण समस्या जाणून घेण्याऐकजी अभिजित बिचुकले त्याचे म्हणणे परतवून लावण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणतो, आपल्या स्ट्रॅटेजीमध्ये माझ्या स्पर्शाला कधी कधी मान द्या. अभिजित बिचुकलेची प्रतिक्रिया माधवला स्तब्ध करते आणि तो बिचुकलेला समजावणे सुरूच ठेवतो. बिचुकलेही जिद्दी असल्यामुळे कुणाचेही ऐकून घेत नाही. बिचुकलेला त्याची चूक समजून तो माधवचा सल्ला गांभीर्याने घेईल का, हे वूटच्या ‘अनसीन अनदेखा’वर बघता येईल.

आपली प्रतिक्रिया द्या