शवागरात रुग्णालयाच्या कर्मचार्‍यांची तरुणींसोबत बर्थडे पार्टी, फोटो व्हायरल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका रुण्गालयातील शवागरात कर्मचारी तरुणींसोबत बर्थडे पार्टी साजरी करत होते. इतकेच नाही जेव्हा त्यांना विचारणा करण्यात आली तेव्हा उलट आपले काम करा असे उद्धट उत्तर त्यांनी दिले.

इंदूरच्या एका रुग्णालयात शवागृहात दोन तरूण आणि दोन तरुणी पार्टी करत होते. दररोज सांयकाळी सहा ते सातच्या सुमारास या भागात कोणी नसतं. ही संधी साधून रुग्णालयाचे दोन कर्मचारी दोन तरुणींना घेऊन येते.

मंगळवारी एका कुटुंबातील आपल्या नातेवाईकाचा मृतदेह घेऊन शवागरात आले. तेव्हा दोन तरुण आणि तरुणी तिथे उपस्थित असल्याचे कळाले. त्यांनी त्याचे फोटोही काढले. जेव्हा त्यांना जाब विचारला तेव्हा त्यांनी उलट आपले काम करा असे उलट उत्तर दिले.

नातेवाईकांनी रुग्णालाय प्रशासनाकडे तक्रार केली. दोघेही कंत्राटी कामगार होते.  तेव्हा प्रशासनाने दोन्ही कर्मचार्‍यांना कामावर काढून टाकले. दरम्यान या घटनेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.