
सामना ऑनलाईन । मुंबई
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे लोकसभा निवडणुकीसाठीचा उमेदवारी अर्ज भरणार आहेत. अमित शहा हे पहिल्यांदाच लोकसभेची निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करताना उद्धव ठाकरे यांनी देखील उपस्थित रहावे अशी इच्छा अमित शहा यांनी व्यक्त केली. या निमंत्रणाला उद्धव ठाकरे यांनी होकार दिला असून ते शनिवारी गांधीनगरमध्ये उपस्थित राहणार आहेत.
लोकसभा निवडणुकीआधी शिवसेना-भाजपने युतीतच पुढील निवडणुका लढवणार असल्याचे जाहीर केले. यानंतर महाराष्ट्रात शिवसेना-भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे मेळावे घेण्यात आले. तसेच कोल्हापूरमध्ये शिवसेना-भाजप युतीच्या प्रचाराचा नारळ फोडण्यात आला. यावेळी अतिविराट सभा झाली. यामुळे युतीची ताकद देशाला पाहायला मिळाली.






























































