
सामना ऑनलाईन । लखनौ
समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांना टक्कर देण्यासाठी भाजपने भोजपूरी चित्रपटातील सुपरस्टार अभिनेता निरहुआ याला रिंगणात उतरवले आहे. भाजपने निरहुआ उर्फ दिनेश लाल यादव याला आजमगढ येथून तिकीट दिले आहे. त्यामुळे निरहुआच्या प्रसिद्धीचा भाजपला फायदा होण्याची शक्यता आहे.

BJP releases 16th list of 6 candidates in Maharashtra and Uttar Pradesh for #LokSabhaElections2019 . Manoj Kotak to contest from Mumbai North East (where Kirit Somaiya is the sitting MP), Dinesh Lal Yadav ‘Nirhua’ to contest from Azamgarh (UP) against SP’s Akhilesh Yadav. pic.twitter.com/uQvwJpGRSl
— ANI (@ANI) April 3, 2019
भाजपने आज लोकसभा उमेदवारांची 16 वी यादी जाहीर केली. या यादीत त्यांनी निरहुआच्या उमेदवारीची घोषणा केली. या व्यतिरिक्त भाजपने रायबरेली मतदारसंघातून सोनिया गांधींविरोधात दिनेश प्रताप सिंग तर मैनपूरी मतदारसंघातून मुलायम सिंग यांच्याविरोधात प्रेम सिंग शाक्य यांना तिकीट दिले आहे.





















































