
सामना ऑनलाईन । मुंबई
हिंदुस्थानवर आमचा बरोबरीचा हक्क आहे, आम्ही इथले भाडेकरू नाही असे विधान करणारे एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दिन ओवैसी यांच्यावर भाजपने पलटवार केला आहे. कॅबिनेट मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांच्यानंतर आता भाजप नेते माधव भंडारी यांनी ओवैसी यांच्या निशाणा साधला आहे. मुसलमानांना कोणीही भाडेकरू म्हटलेले नाही. आणि जर बरोबरीच्या हक्काची भाषा करत असाल तर तुमचा हिस्सा 1947 रोजीच देण्यात आला आहे, असेही ते म्हणाले.
माधव भंडारी यांच्याआधी कॅबिनेट मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी ओवैसी यांच्या वक्तव्यावर निशाणा साधला. ओवैसी यांच्यावर पलटवार करताना नकवी म्हणाले की, काही लोक रोजी-रोटीसाठी अशा प्रकारची वक्तव्य करत आहेत. हे लोग धर्म, जातीच्या नावावर भडकावू वक्तव्य करत आहेत. यामुळे कोणाचाही फायदा होणार नाही. मोदींवर 130 कोटी लोकांचा विश्वास आहे आणि मोदींच्या नेतृत्वाखाली देश सुरक्षित आहे.
काय म्हणाले होते ओवैसी?
शनिवारी ओवैसी म्हणाले की, काहींना वाटत आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदींना 303 जागा मिळाल्या आहेत तर ते मनमानी कारभार करू शकतात, परंतु आम्ही होऊ देणार नाही. आम्ही देशाला पुढे नेऊ, देशाचा विकास करू. इथे आमचा हक्क समान आहे. इथे आम्ही भाडेकरू नसून आम्ही हिस्सेदार राहू असेही ओवैसी यावेळी म्हणाले.































































