
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या चर्चेवर भाजप नेते, मंत्री अतुल सावे यांनी टोला हाणला. मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे हेच राहणार असून अजित पवार हे पुढील 20 ते 25 वर्षानंतर मुख्यमंत्री होतील, असे सावे म्हणाले. अजित पवार कधी मुख्यमंत्री होणार हे स्पष्ट नाही. त्यांना मुख्यमंत्री कधी करतील हे काही लिहिलेले नाही. भविष्यात ते मुख्यमंत्री होऊ शकतात. भविष्य म्हणजे ते कधीही असू शकते, 10 वर्षात, 20 वर्षात किंवा 25 वर्षानंतर, असा चिमटा अतुल सावे यांनी काढला.


























































