आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील कोरोना पॉझिटिव्ह

भारतीय जनता पक्षाचे नेते आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ते होम कॉरनटाईन झाले असून आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांनी तपासणी करून घ्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे.

येत्या 17 एप्रिलला पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूकीचे मतदान आहे. भाजप उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचाराची मुख्य धुरा मोहिते-पाटील यांच्या खांद्यावर आहे. निवडणुकीच्या ऐन धामधुमीत मोहिते-पाटील यांची चाचणी पॉझिटिव्ह आल्याने भाजपच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे.

आपली प्रतिक्रिया द्या