
कर्नाटकमध्ये काँग्रेसमधून भाजपवासी झालेले आमदार श्रीमंत पाटील यांनी एक धक्कादायक खुलासा केला आहे. भाजपमध्ये येण्यासाठी आपल्याला पैश्यांची ऑफर दिली होती असा खळबळजनक दावा त्यांनी केला होता. परंतु आता त्यांनी या वक्तव्यावरून यु टर्न घेत आपल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचे सांगितले.
श्रीमंत पाटील हे कर्नाटकातील कागवाड विधानसभेचे आमदार आहेत. ते माजी मंत्री असून जेव्हा अनेक काँग्रेस नेत्यांनी पक्षाला रामराम करत भाजपमध्ये सामील झाले होते त्यात श्रीमंत पाटील यांचाही समावेश होता.
I joined BJP without taking money. I was asked how much money I wanted but I refused &asked for minister’s post to serve people. I don’t know why I wasn’t made a minister in this govt but I’ve been promised ministerial berth in next expansion: Karnataka MLA Shrimant Patil (11.09) pic.twitter.com/q28p3lzPts
— ANI (@ANI) September 13, 2021
काही दिवसांपूर्वी कर्नाटकमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार झाला होता. श्रीमंत पाटील यांना मंत्रिपद मिळेल अशी चिन्हे होती, परंतु त्यांना मंत्रिपद मिळाले नाही.
तेव्हा प्रतिक्रिया देताना पाटील असे म्हणाले होते की, भाजपमध्ये सामील होण्यासाठी मला पक्षाकडून पैश्यांची ऑफर देण्यात आली होती. तरी पैसे न घेता मी पक्षात सामील झालो. जनतेच्या सेवेसाठी मला मंत्रिपद हवे होते. पक्षाने मला मंत्रिपदाचे वचन दिले आहे. पुढील वेळी नक्की आपला विचार होईल असे पक्षाने आपल्याला सांगितल्याचे पाटील यांनी सांगितले.
पाटील यांच्या वक्तव्यानंतर एकच वाद निर्माण झाला. परंतु आपण असे काही बोललोच नाही असे पाटील म्हणाले. तसेच आपल्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचे सांगून आपल्या विधानावरून त्यांनी यु टर्न घेतला.

























































