कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांना देण्यात येणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या दोघांना दरोडा व वाहनचोरी पथकाने अटक केले.
त्यामध्ये िंहजवडीतील एका नर्ससह तरुणाचा समावेश आहे. पृथ्वीराज संदीप मुळिक (22, रा. दत्तनगर, आंबेगाव ) आणि नीलिमा किसन घोडेकर (रा. भूमकर चौक, हिंजवडी ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
कोरोना झालेल्या रुग्णांना देण्यात येणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शन कात्रजमधील दत्तनगरमध्ये जादा दराने विक्री होत असल्याची माहिती दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकातील गणेश ढगे यांना मिळाली. त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक जुबेर मुजावर यांच्या मार्गदर्शनाखााली सापळा रचून एक बनावट ग्राहक संबंधिताकडे पाठविण्यात आले.
त्यानुसार पोलिसांनी पृथ्वीराज मुळीकला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने मैत्रिण नर्स नीलीमा घोडेकर यांच्याकडून रेमडेसिवीर इंजेक्शन घेतल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी हिंजवडीत नामांकित रुग्णालयात नर्स म्हणून कार्यरत असलेल्या नीलिमाला अटक केले. याप्रकरणी आणखी काही आरोपींना अटक होण्याची शक्यता आहे.
त्याशिवाय मुद्देमाल जप्त होण्याची शक्यताही पोलिसांनी व्यक्त केली आहे. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक जुुबेर मुजावर, नीलेश शिवतरे, धनंजय ताजणे, गणेश पाटोळे, अतुल मेंगे, मॅगी जाधव, गणेश ढगे, सुमीत ताकपेरे, श्रीकांत दगडे, ऋषीकेश कोळप, चेतन होळकर यांच्या पथकाने केली.
काळाबाजार रोखण्यासाठी 10 पथकांची स्थापना
कोरोना रुग्णांना देण्यात येणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनची जादा दराने विक्री टाळून काळा बाजार रोखण्यासाठी पुणे पोलिसांनी विशेष मोहिम हाती घेतली आहे. त्यासाठी 10 पथकांची स्थापना करण्यात आली आहे. नागरिकांना रेमडेसिव्हिर इंजेक्शनबाबत काळा बाजार होत असल्यास नियंत्रण कक्षाशी दूरध्वनि क्रमांक 100 यावर संपर्क करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.