
सामना प्रतिनिधी । परळी वैजनाथ
सोमवारी रात्री नंदागौळच्या पुढे पूस रस्त्यावर एका युवकाची निर्घृण हत्या झाल्याची घटना घडली आहे. या युवकाचा गळा चिरून पोटात सपासप वार केलेले आहेत. हे वार चाकूने केले असल्याची शक्यता आहे. या घटनेने परळीत एकच खळबळ उडाली असून नागरिकामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
शहरातील बरकत नगर परिसरातील शेख मगदूम कलंदर हे आपल्या मित्रासोबत गावाजवळ असलेल्या चांदापुर तलावावर पार्टी करण्यासाठी गेले होते. तिथून ते परळीला परत आले. रात्री 9.30 च्या सुमारास शेख मगदूम कलंदर यांचा मृतदेह नंदागौळ पुढे पूस रस्त्यावर रक्तबंबाळ स्थितीत आढळून आला. याची माहिती परळी ग्रामीण पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान परळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे एपीआय एम.एन.शेळके हे या प्रकरणाचा तपास करत आहेत. शेख मगदूम कलंदर यांच्या सोबत पार्टीला गेलेला त्याचा मित्र फरार असून त्याचा तपास पोलीस करत आहेत.नेमकी हत्या कुठे आणि कधी झाली याचा तपास पोलीस करत आहेत.




























































