
सामना ऑनलाईन । तिरुअनंतपुरम
‘गृहलक्ष्मी’ मासिकाच्या मुखपृष्ठावर बाळाला स्तनपान करतानाचा मॉडेलचा फोटो छापल्यामुळे केरळमध्ये प्रचंड वाद निर्माण झाला होता. मासिकाच्या विरोधात काही जणांनी न्यायालयात धाव घेतली होती. मात्र अश्लिलता ही फोटोत नसून बघणाऱ्याच्या डोळ्यात आहे, असं म्हणत केरळच्या उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना जोरदार चपराक दिली आहे.
There is no obscenity in a woman breastfeeding a baby on ‘Grihalaxmi’ magazine cover, obscenity lies in the eyes of the beholder: Kerala High Court
— ANI (@ANI) June 21, 2018
या मासिकाच्या १ मार्च रोजी प्रकाशित झालेल्या आवृत्तीवर मॉडेल गिलू जोसेफ हिचा बाळाला स्तनपान करतानाचा फोटो छापण्यात आला होता. समाजात ब्रेस्टफिडींग विषयी समाजात जनजागृती करण्यासाठी विशेषांक काढला होता. या विशेषांकात साडी नेसलेली मॉडेल कोणताही आडपदर न घेता थेट बाळाला स्तनपान करतानाचा फोटो मुखपृष्ठावर छापण्यात आला होता. त्यासोबत “कृपया नजर रोखून बघू नका आम्ही बाळाला दूध पाजत आहोत.” असा संदेश पुरुषांसाठी देण्यात आलेला होता.






















































