ब्रिटनचे बोरीस जॉन्सन सरकार अडचणीत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ब्रिटनच्या वित्त आणि आरोग्यमंत्र्यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्याने पंतप्रधान बोरीस जॉन्सन सरकार अडचणीत सापडले आहे. मंगळवारी रात्री अचानक वित्तमंत्री ऋषी सुनक व आरोग्यमंत्री साजिद जाविद यांनी आपापल्या पदांचा राजीनामा दिला.

या अनपेक्षित घटनाक्रमामुळे अगोदरच वादात सापडलेल्या पंतप्रधान जॉन्सन यांच्या अडचणींत मोठी भर पडली असून विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे.

बोरिस यांनी पद सोडल्यास येणाऱया काही दिवसांत ऋषी सुनक हे त्यांचे उत्तराधिकारी बनून पंतप्रधान बनतील का, अशीदेखील चर्चा सुरू आहे. सुनक हे हिंदुस्थानातील नामांकित उद्योगपती नारायण मूर्ती यांचे जावई आहेत.