अमृतसरमध्ये हिंदुस्थान-पाकिस्तान सीमेवर संशयित ड्रोन, बीएसएफच्या महिला पथकाकडून कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
PAKISTAN-DRONE

सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) च्या महिला गस्ती पथकाने 28 नोव्हेंबर रोजी उशिरा पंजाबमधील अमृतसर सीमेवर पाकिस्तानमधून हिंदुस्थानच्या हद्दीत घुसलेले ड्रोन पाडले.

अमृतसर शहराच्या उत्तरेस 40 किमी अंतरावर असलेल्या चाहरपूर गावाजवळ ड्रोन हिंदुस्थानच्या हद्दीत घुसल्याचे बीएसएफच्या गस्ती पथकाच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्यावर गोळीबार केला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.