जालन्यातील भोकरदनमध्ये शेतात वीज पडल्याने म्हशीसह रेडकू दगावले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील मौजे पिंपळगाव बारव येथील शेतात अचानक वीज पडून म्हशीसह रेडकू दगावल्याची घटना बुधवारी दुपारी 3.55 वाजता गट नं 64 मध्ये घडली.

भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव बारव येथे दुपारी तीन वाजेच्या सुमारास ढग दाटून आले होते. तसेच वीजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली.साहेबराव बळवंता फटाले यांच्या शेतातील लिंबाच्या झाडाखाली म्हैस व तिचे रेडकू बांधलेले होते. त्यावेळी जोरदार वीज कडाडून म्हैशीच्या अंगावर पडल्याने म्हशीसह रेडकूचा जागेवरच मृत्यू झाला. वीज पडल्याने लिंबाचे झाडही जमिनीवर कोसळले. म्हैस व रेडकू दगावल्याने शेतकऱ्याचे अंदाजे 65 हजारांचे नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे.