बँक आँफ महाराष्ट्रचे छत कोसळून एक जण गंभीर जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। चंद्रपूर

जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेचे छत कोसळून एक जण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर राजुरा येथील ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरु आहे. संतोष मारोती देवाळकर (३३) असे त्याचे नाव आहे. तो चिंचोली गावचा रहिवाशी आहे.

बँकेत जमा रक्कम काढण्यासाठी देवाळकर आला होता. बँकेची दुपारच्या जेवणाची वेळ झाल्याने तो बँकेतच उभा होता. सोबत अन्य खातेदारही होते . एवढ्यात अचानक वरील छताचे सिमेंट काँक्रिटचे छत त्यांच्या डोक्यावर कोसळले. दैव बलवत्तर म्हणून एवढ्या मोठ्या दुर्घटनेतून तो थोडक्यात बचावले. घटना घडताच उभे असलेले अन्य खातेदार ग्राहक देवाळकर यांला मदतीला धावून गेले. यावेळी शाखा व्यवस्थापक राकेश चौघे यांनी सर्वाना बाहेर हाकलवून लावले. व बँकेत चोरी होईल म्हणून दार बंद करायला सांगितले परंतू जखमी अवस्थेत असलेल्या देवाळकर यानी स्व:ता दुचाकीवरून ग्रामीण रुग्णालयात गेले या बँकेची ईमारत ही नगरपरिषद च्या मालकीची असल्याने तात्काळ नगराध्यक्ष अरुण धोटे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.