सर्वच आरक्षणे रद्द करा- खासदार उदयनराजे भोसले

udayanraje-bhosale

मराठा आरक्षण देता येत नसेल तर सगळेच आरक्षण रद्द करा आणि मेरीटनुसार निवड करा, अशी मागणी भाजपचे राज्यसभा खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केली.

‘मराठा समाजातील मुलांना चांगले गुण मिळूनही प्रवेश मिळत नाही आणि इतर समाजातील मुलांना कमी गुण असूनही प्रवेश मिळतात. देवाने प्रत्येकाला बुद्धी दिली आहे. सगळेच आरक्षण रद्द करून मेरिटवर आरक्षण द्यावे. ज्याने कष्ट घेतले नाहीत त्याला आरक्षणावर प्रवेश मिळतो आणि जो कष्ट घेतो त्याला आरक्षण नसल्याने प्रवेश मिळत नाही, असे ते म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या