
चंद्रकांत पालकर । पुणे
पुणे जिल्ह्यात अपघातांची मालिका वाढत असतानाच पुणे-सातारा महामार्गावरील खेडशिवापूर टोलनाक्याच्या जवळ झालेल्या अपघातात कारचालकासह तीन महिला तीनच्या सुमारास खेडशिवापूर (ता. हवेली) येथील महामार्गावरील सागर हॉटेलच्या समोर ही घटना घडली आहे.ओंकार मोहन पोळ (कारचालक वय २७, रा. शिंदेवाडी, ता. भोर), अश्विनी आसवले, उज्वला सणस व अरूणा भोसले अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत.
राजगड पोलीस ठाण्याचे फौजदार समीर कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे बाजूकडून सातारच्या दिशेने निघालेल्या कार (एमएच १२, ०२८९) भरधाव जात असताना कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या मालट्रकला जोरदार ठोस देऊर कार निम्म्याहून अधिक घुसल्याने या अपघातात कारमधील चारजण जागीच ठार झाले आहे. अपघातातील तिन्ही महिला खडकमाळ पुणे येथील रहिवाशी असल्याचे समजते.
अपघाताचा हा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. या व्हिडीओमध्ये भरधाव वेगातील कार ट्रकला मागच्या बाजूने धडक देताना दिसत आहे. धडक इतक्या जोरात होती की कारचा चुरा अक्षरक्ष: होतो. अपघातानंतर घटनास्थळावर रक्त आणि मांसाचा चिखल झाला होता. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.
अपघाताचा थरारक व्हिडीओ:

























































