कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

17
प्रातिनिधिक छायाचित्र

सामना प्रतिनिधी। जळकोट

मुखेड – शिरुर ताजबंद राज्य महामार्गावर वांजरवाडा (ता.जळकोट ) गावाच्या हद्दीत कारने दुचाकीस जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. सोमवारी सायंकाळी ही घटना घडली आहे. शेषेराव शंकरराव चिवडे (५०) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या अपघातानंतर कारचालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. कारचालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्यानेच हा अपघात झाला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

शेषेराव होकर्णाचे रहिवासी होते. ते आपल्या दुचाकीवरून वांजरवाडा येथून जांब (बु. ) कडे निघाले होते. त्याचवेळी मागून भरधाव वेगात येणाऱ्या कारने ( गाडी नंबर एम एच २४ / व्ही. ६८७७ ) दुचाकीला जोराची धडक दिली. यात शेषेराव रस्त्याच्या कडेला फेकले गेले व त्यांचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान , दुचाकीला धडक दिल्यानंतर कारही बाजूच्या शेतात जाऊन पलटली.

आपली प्रतिक्रिया द्या