
राज्यातील नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या वतीने करीअरविषयी मार्गदर्शन करण्यासाठी वेबिनार सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. यातील पहिले सत्र 12 मे रोजी होणार आहे.
वेबिनारचे प्रक्षेपण राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या यूटय़ूब चॅनेलवर करण्यात येणार आहे. दुपारी 3 ते 4 या वेळेत या वेबिनारचे प्रक्षेपण होईल. राज्यातील सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक, प्राचार्य यांनी सदर वेबिनारला उपस्थित रहावे, असे आवाहन राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने केले आहे.
यूटय़ूब लिंक- https://youtube.com/live/ddy6q_8ynf4?feature=share

























































