
सामना प्रतिनिधी, मुंबई
निवडणूक आयोगाबाबत आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल भारतीय रिपब्लिकन पार्टी-बहुजन महासंघाचे संस्थापक अध्यक्ष ऍड. प्रकाश ऊर्फ बाळासाहेब आंबेडकर यांच्याविरुद्ध यवतमाळच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पोलिसांमध्ये गुन्हा नोंदविला आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली.
निवडणूक आयोगाबाबत ऍड. आंबेडकर यांनी बुधवारी दिग्रस (जि. यवतमाळ) येथे झालेल्या जाहीर सभेत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्या अनुषंगाने त्यांच्याविरुद्ध दिग्रस पोलीस ठाण्यामध्ये भादंवि कलम 503, 506, 189 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


























































