सुशांतच्या बहिणींवर रियाने केलेले आरोप हा केवळ एक अंदाज! सीबीआयचे हायकोर्टात प्रतिज्ञापत्र

सुशांतची बहिणी मीतू व प्रियंका यांनी बनावट डिस्क्रिप्शनच्या आधारे सुशांतला ड्रग्स देण्याचा प्रयत्न केला त्यामुळे त्याचा मृत्यू झाला असा आरोप रियाने केला आहे. मात्र रियाने केलेले हे आरोप हा केवळ एक अंदाज आहे असे स्पष्टीकरण आज सीबीआयने हायकोर्टात दिले तसे प्रतिज्ञापत्रच सीबीआयच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात सादर करण्यात आले.

सुशांतची एक बहीण दिल्लीतील डॉक्टराच्या मदतीने बनावट डिस्क्रिप्शनच्या आधारे तसेच फेस रेकॉर्ड तयार करत सुशांतला ड्रग्ज देण्याचा प्रयत्न करत होती असा आरोप रियाने केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी 7 सप्टेंबर रोजी सुशांतच्या बहिणी प्रियंका सिंग आणि मीतू सिंग या दोघींवर गुन्हा दाखल केला.

हा गुन्हा रद्द करण्यात यावा तसेच सीबीआय ने कोणतीही कारवाई करू नये अशी मागणी करत प्रियंका आणि मीतू ने हायकोर्टात याचिका दाखल केली. याप्रकरणी आज सीबीआयच्या वतीने न्यायमूर्ती एस. एस. शिंदे व न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंठपीठासमोर प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले त्यात असे म्हटले आहे की रिया ने एफआयआर मध्ये नोंदवलेले आरोप बहुधा गृहीत धरून तसेच अंदाजावरून केले आहेत. ते निराधार आहेत. हे आरोप नोंदवून घेण्यापूर्वी मुंबई पोलिसांनी प्राथमिक चौकशी करायला हवी होती.

तक्रार सीबीआयकडे पाठवायला हवी होती

सुशांतच्या मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआय करत आहे याची मुंबई पोलिसांना कल्पना होती त्यामुळे त्यांनी रिया ची तक्रार परस्पर नोंदवून न घेता ती सीबीआयकडे पाठवायला हवी होती अशी अपेक्षा होती असे सीबीआयने आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. हायकोर्टाने हे प्रतिज्ञापत्र दाखल करून घेत मुंबई पोलिसांना 4 नोव्हेंबर पर्यंत उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या