मोबाईल चोरणारी टोळी गजाआड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मोबाईल चोरून पसार होणारी चार जणांची टोळी शिवडी पोलिसांनी जेरंबद केली.  आरोपीची घरझडती घेतली असता चोरीचे 18 मोबाईल आणि एक संगणक मिळून आला. दिनकर (नाव बदललेले) हे रस्त्याने पायी जात असताना दुचाकीवरून आलेल्या तीन इसमांनी दिनकर यांच्या हातावर फटका मारून त्यांच्या हातातील मोबाईल हिसकावून नेला होता. याप्रकरणी शिवडी पथकाने अर्जुनकुमार चौधरी आणि अब्दुल  शहा या दोघांना अटक केली. त्यानंतर वाहीदुर चौधरी आणि हुसेन शेख अशा दोघांना पकडले.  या आरोपींकडून चोरीचे 18 मोबाईल जप्त केले.