किती शेतकरी आणि विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या? मोदी सरकार म्हणते आम्हाला माहीत नाही

suicide

कोरोना लॉकडाऊन काळात किती मजुरांचा मृत्यू झाला? माहित नाही. किती कोरोनायोद्धा डॉक्टर मृत्युमुखी पडले? डेटा नाही. किती शेतकरी आणि विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या? यासर्व प्रश्नांवर केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचे एकाच उत्तर ठरलेले आहे ते म्हणजे माहित नाही.

किती शेतकऱ्य़ानी आत्महत्या केल्या? त्यामागची करणे काय याची माहिती अनेक राज्यांनी आणि केंद्र शासित प्रदेशांनी स्वतंत्रपणे दिलेली नाही. त्यामुळे आम्ही डेटा देऊ शकत नाही, असे गृहराज्यमंत्री रेड्डी म्हणाले. कोरोना लॉकडाऊन काळात विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी मोबाईल,कॉम्पुटर या डिजिटल सुविधा मिळाल्या नसल्यामुळे  नैराश्येतून देशात किती विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या असा प्रश्न द्रमुकच्या खासदार कनिमोझी यांनी लोकसभेत विचारला होता. त्यावर लेखी उत्तर देताना केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी सरकारकडे माहिती नाही असे उत्तर दिले.

आपली प्रतिक्रिया द्या